पॅट्रिक लेव्ही

French

English

Hebrew

Italian

Hindi Tamil

Contact






मराठी मध्ये पुस्तके



लिव्हिंग विथ साधुज्
LIVING WITH SADHUS
Translation by Meena Shete-Sambhu. Padmagandha Prakashan, 2017.

साधूंच्या जगतातील एक आध्यात्मिक प्रवास!

साधू : जटांच्या पलीकडे असलेली व्यक्तित्वे. ते लाखो जण आहेत... भटके, भारतीय, सर्वसंगपरित्यागी... भिक्षा मागणारे साधू, गूढ यात्री, भ्रमंती करणारे, तत्त्वज्ञ, चमत्कार करणारे, हशीश ओढणारे, पवित्र पुरुष... मात्र त्यांच्याविषयी अत्यल्प माहिती आहे. त्यांची छायाचित्रे नेहमीच घेतली जातात; परंतु त्यांचे शब्द मात्र क्वचितच ऐकले जातात. काहीजणांनी बालपणापासूनच या जीवनमार्गाची निवड केली होती; तर काहीजण होते पूर्वाश्रमीचे लोकसेवक, दुकानदार, रिअल इस्टेट एजंट, चोर... . त्यांनी आपापल्या कुटुंबांचा आणि कामांचा त्याग केला होता आणि ते सर्वसंगपरित्यागी साधू बनले होते. त्यांनी काम करणे नाकारले होते आणि कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय न करण्याची शपथ घेतली होती. ते मुक्तीच्या मार्गावरून निघाले होते. काहीजण उग्र तपश्‍चर्या करत होते; परंतु त्यांच्यापैकी बहुतांशजण अकर्माचे तत्त्व आचरत होते. अल्पावधीतच घडून येणार्‍या पर्यावरणीय विनाशाच्या आणि भरमसाट लोकसंख्येच्या त्सुनामीच्या दिशेने चाललेल्या जगात साधू हेच एक प्रकारच्या मुक्तीचे आणि मध्यममार्गाचे दूत आहेत. पॅट्रिक लेव्ही यांनी साधूंच्या दैनंदिन जीवनाचे, त्यांना दिल्या जाणार्‍या आदराचे, त्याचा ते कसा वापर करून घेतात त्याचे, त्यांची शिकवण, तत्त्वज्ञान, जीवनशैली आणि त्यांच्या साधुत्वाच्या आचरणाचे रूपांतर याचे सविस्तर वर्णन केले आहे.

424 Indian Rupee